शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

कलियुग

एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- "कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?"
       या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,"कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.
      " असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. 
       सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.
        जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकूआला तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे. 
       या दैवी पक्षीचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला त्याने ते ठिकाण पटकन सोडले.
       भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. 
       एका विहरीभोवती चार विहीरी होत्या. 
       चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत आहे.
       पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.
       हे पाहून भीम चक्रावून गेला.
      नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. 
       जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. 
       पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते.
      खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. 
      तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. 
      हे पाहून नकूल गोंधळून गेला.
      सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली.
      ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली.
      यावेळी सहदेवही चकीत झाला.
      या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला. 
      श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला. 
     "कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती.
      कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील.
      श्रीमंताकडे खूप धन असेल ठेवायला जागा नसेल पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.
      कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.
       कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले."

      हनुमंत खाडे

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

मोक्ष मार्गावर सर्वांना बरोबर घेऊन चालणे

ते हे माय ज्ञानेश्वरी

हनुमंत खाडे
        ९६६५६५६५९२

तैसा मनाचा मारू न करता ।आणि इंद्रिया दुखः न   देता ।एथ मोक्ष असे आयता ।श्रवणाची माजि ।अ ४ -२२३

आपल्या कथेबद्दल भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतात कि येथे मनाला न मारता, इंद्रियांना दुखः न देता ,आयते फक्त श्रवणाने मोक्ष मिळणार आहे म्हणजे मोक्ष मार्गावर सर्वाना बरोबर घेऊन चालणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते.
आपल्या ग्रंथ लेखनाचा हेतू सांगताना ते म्हणतात की,
माझे शब्द रुपी ताटे, त्यात मोक्ष रुपी पक्वान्ने वाढली आहेत,
ही मेजवानी मी निष्काम पुरुषास केली आहे.

साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र । पै संसारु जीणते हे शस्त्र ।आत्मा अवतारीते मंत्र ।अक्षरे येथे ।अ १५ -५७६

आपले बोल हे केवळ शब्द नसून ते संसार जिंकणारे शस्त्र आहेत,
ही आत्म्यापर्यंत पोहोचवणारी मंत्राक्षरे आहेत असे ते सांगतात .
श्री गुरुंना भगवान श्री ज्ञानोबाराय विनंती करतात कि या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल करा व या जगाला केवळ ब्रम्ह्सुखाचेच देणेघेणे होऊ द्या.
येथेही भगवान श्री ज्ञानोबारायांची इच्छा जगाला ब्राम्ह्ज्ञानाचे मार्गावर नेणे ही आहे हे स्पष्ट होते.
यापुढे गुरूना विश्वोध्दाराची मागणी करताना ते म्हणतात ,
याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू, गीतार्थाने विश्व भरून टाकू, सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू,
हे गुरु, परब्रम्ह सर्वांच्या डोळ्यास दिसो, सुखाचा उत्सव उदयास येवो,
व सर्व जग ब्रम्ह ज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो.
ही अशी सर्व जगासाठी प्रार्थना करणे यातच भगवान श्री ज्ञानोबारांचे वेगळेपण आहे.
वैयक्तिक धर्माचरणाचे विविध मार्ग ग्रंथातून पूर्वी सांगितले गेले होते,
पण समाजाने एकसंधपणे धर्माचरण कसे करावे?
या मोक्षमार्गावर भक्तीचा सोपा घाट कसा बांधावा, कर्मयोगी बनून,
संसारात राहूनही स्वतः बरोबर जगाचा उध्दार कसा करावा,
हे सांगणारी भागवत धर्माची गुढी प्रथम उभी केली
भगवान श्री ज्ञानोबारायांनी,
त्यांना शतशत प्रणाम..!

हनुमंत खाडे
        ९६६५६५६५९२

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

सार्थ ज्ञानेश्वरी दिवस ३ रा

      *💝दिवस ३ रा💝*
   *🌟अध्याय पहिला🌟*
*☀सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या☀*
*💡॥अर्जुनविषादयोग॥💡*
  *🔔ओव्या 26 ते 35🔔*
         *हनुमंत खाडे*
        *९६६५६५६५९२*
⛳🌺⛳🌺⛳🌺⛳🌺⛳
*का तीर्थे जिये ञिभुवनी । तिये घडती समुद्रावगाहनी ।*
*ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६॥*
*✏जगामध्ये* जेवढी म्हणुन तिर्थक्षेञे आहेत.
त्या सर्वांचे(तीर्थस्नाने)केवळ एकट्या समुद्रस्नाने घडतात.किंवा फक्त अमृत सेवन केले असता.सर्व रसयीं गोडी त्यामध्ये अंतर्भुत असते.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*तैसा पुढतपुढती तोची । मियां अभिवंदिला श्रीगुरूचि ।*
*जे अभिलषित मनोरुची । पुरविता तो ॥२७॥*
*✏त्याप्रमाने* एकट्या श्रीगुरुच्या वंदनात सर्वांना वंदन घडते.म्हणुन मी सद्गुरुनां वारंवार वंदन करतो.
कारण ते मनात आलेले मनोरथ पुर्ण करतात.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*आता अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुका जन्मस्थान ।*
*की अभिनव उद्यान । विवेकतरूचे ॥२८॥*
*✏आता* ही कथा लक्षपुर्वक ऐका! जी कलेच्या नवलाईच्या आविर्भावाचे उगमस्थान,किंवा विचाररुपी तरुंचें नवे विशाल अपुर्व उद्दान आहे.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधी ।*
*नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ॥२९॥*
*✏म्हणुन* सर्वसुखाचे आश्रयस्थान आहे.अनेक तत्वार्थांचा मोठा साठा ,किंवा श्रुगांरादि नऊ रसांनी तुडुंब भरलेला सागरच आहे.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*की परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।*
*शास्त्रजाता वसिष्ठ । अशेषांचे ॥३०॥*
*✏सर्वांनां* उघडपणे दिसनारा सर्वोत्तम ज्ञानप्रकाश,किंवा सर्व विद्दाचें मुलस्थान किंवा सर्व शास्ञ समुहाचे आश्रयस्थान आहे.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*ना तरी सकळ धर्मांचे माहेर । सज्जनांचे जिव्हार ।*
*लावण्यरत्नभांडार । शारदियेचे ॥ ३१॥*
*✏सर्वधर्माचे माहेर* सज्जनांचा जिव्हाळा आहे.किंवा सरस्वतीच्या लावन्यमय रत्नांचा खजिना,अशी आहे.
🏮💎🏮💎🏮💎🏮💎🏮
*नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती ।*
*आविष्करोनी महामती । व्यासाचिये ॥ ३२॥*
*✏व्यासाच्या* विशाल बुद्धिमध्ये प्रकट होऊन वाग्देवता या आख्यानाच्या रुपाने जगतात अवतरली आहेत.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*म्हणोनी हा काव्यां रावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।*
*एथुनि रसां आला आवो । रसाळपणाचा ॥ ३३॥*
*✏त्यामुळे* हा महाकाव्याचा राजा आहे.ग्रंथाच्या थोरपणाची सीमा आहे.येथुनच रसांना रसाळपणाची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*तेवींचि आइका आणिक एक । एथुनि शब्दश्री स्वच्छास्त्रिक ।*
*आणि महाबोधि कोवळीक । दुणावली ॥ ३४॥*
*✏तसेच* आणखी एक ऐका ! या महाभारत ग्रंथामुळे
शब्दाच्या संपत्तिला शुद्ध शास्ञियता प्राप्त झाली.ब्रम्ह ज्ञानाचे निरुपण सुंदर समर्पक शब्दात करता येऊ लागले.उपदेशा मध्ये कोमलता आली.
💎🏮💎🏮💎🏮💎🏮💎
*एथ चातुर्य शहाणे झाले । प्रमेय रुचीस आले ।*
*आणि सौभाग्य पोखले । सुखाचे एथ ॥ ३५॥*
✏येथे *चातुर्य* सुद्धा शहाने झाले.प्रेमाला आधिकच मधुरता प्राप्त झाली.सुख भाग्यवान ठरले.
⛳💗⛳💗⛳💗⛳💗⛳
*🙏🌻🌹राम कृष्ण हरि🌹🌻🙏*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
        *हनुमंत खाडे*
              *९६६५६५६५९२*

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

सार्थ ज्ञानेश्वरी दिवस १ ला

      💝दिवस1ला💝
   🌟अध्याय पहिला🌟
☀सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या☀
💡॥अर्जुनविषादयोग॥💡
   🔔ओव्या 1 ते 10🔔
         ९६६५६५६५९२
⛳⛳⛳⛳🌹⛳⛳⛳⛳⛳
ॐनमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरुपा ॥१॥
✏ॐ ची माहिती (प्रतिपादन)केवळ वेदच करु शकतील.
अशा आद्दतत्वाला नमस्कार असो.जो कोनी स्वःताच स्वःताला पुर्णपणे बरोबर जाणु शकतो.अशा आत्मरुप चित्तत्वाचा जयजयकार असो..
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
देवा तूंचि गणेशु । सकलमति प्रकाशु ।
म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥
✏निवृत्तीनाथाचे सेवक ज्ञानदेवांना म्हणतात कि देवा, सर्वाच्यां बुद्धिला ज्ञानाचा प्रकाश असा तुंच गणेश आहेस.असे निश्चित समजावे.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥
✏ज्याचे आकाराने वर्णरुप शरिर चांगले सुशोभित दिसते.असे हे वेद वाग्मय(पुर्ण शब्द ब्रम्ह)म्हणजे गणेशाची उत्तम सजविलेली मुर्ती आहे.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
स्मृति तेचि अवयव । देखा अंगिकभाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥
✏मन्वादिस्मृती हेच(गणेशमुर्तिचे)अवयव, रसविष्कारांची पद्धत हीच जणु अवयवाच्या द्वारे प्रदर्शित होणारी भाव इच्छा अर्थाचे सौष्ठव हेच (गणेश मुर्तितिल)सौदर्याचे तेज आहे.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
अष्टादश पुराणे । तीचि मणिभूषणे ।
पदपद्धती खेवणे । प्रमेयरत्नांची ॥५॥
✏मुर्तितिल अठरापुराणे हेच खरे रत्नजडीत अलंकार तत्वार्थ हिच रत्ने,शब्दाची छंदोबद्ध रचना व त्याचे भिन्न भिन्न प्रकार हिच त्या रत्नाची कोंदणे होत.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
पदबंध नागर । तेचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्यवाणे * सपूर उजाळाचे ॥६॥
✏संपुर्ण प्रकारे विविध काव्यरचना उत्तम अशी अभिरुची
हेच रंगवलेले वस्त्र.
ज्यातील शब्द रचनेतील अलंकार शास्त्र हे त्या वस्त्राचे तलम तजेलदार,भरगच्च पोत आहे.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
देखा काव्यनाटका । जे निर्धारिता सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥७॥
✏असे पहा की,काव्य नाटकाच्या विषयी विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असुन त्यातील अर्थरुप आवाजाने त्या रुणझुणत आहेत.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
नाना प्रमेयांचि परी । निपुणपणे पाहता कुसरी ।
दिसती उचित पदे माझारी । रत्नें भली ॥८॥
✏सर्व एकच पण विविध पद्धतिने प्रतिपादन केलेले तत्व म्हणजे कुशलतेने त्यात वापरलेली उचित शब्दे हीच बहुमुल्य रत्ने,आहेत.असे जाणकार दृष्टिला आढळते.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
तेथ व्यासादिकांच्या मति । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणे झळकती । पल्लवसडका ॥९॥
✏याठिकानी व्यास आणि आदि कविच्या प्रज्ञा तेजस्विपणे झळकतात.त्याच गणेशाच्या कमरेभोवती बांधलेल्या पदरांचे अग्रभाग असुन बिधांस्तपणे मिरवत आहेत.
➖🎈➖🎈➖🎈➖🎈➖🎈
देखा षड्दर्शने म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ॥
म्हणऊनि विसंवादे धरिती । आयुधे हाती ॥१०॥
✏असे पहा की ,सहा दर्शने म्हटली जातात(त्यांनीच(गणेशमुर्तिच्या)सहा हाताचा आकार घेतला आहे म्हणुनच त्या परस्पराशी एकसारखे नाहीत.अशी आयुधें धारण केलेली आहेत.
⛳⛳⛳⛳💗⛳⛳⛳⛳⛳
*निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम*
⛳💝⛳💝⛳💝⛳💝⛳💝
⛳🌺⛳🌺⛳🌺⛳🌺⛳🌺
🌻🌹राम कृष्ण हरि🌹🌻
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

हनुमंत खाडे
   ९६६५६५६५९२

सार्थ ज्ञानेश्वरी दिवस २ रा

      *💝दिवस 2 रा💝*
   *🌟अध्याय पहिला🌟*
*☀सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या☀*
*💡॥अर्जुनविषादयोग॥💡*
  *🔔ओव्या 11 ते 25🔔*
          *९६६५६५६५९२*
⛳⛳⛳⛳☀⛳⛳⛳⛳
*तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।*
*वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११॥*
*✏तेव्हा तर्क*(अनुमान)हाच कोणी फरस(कुर्‍हाड)निती(आचारधर्म,कमीकर्मविचार)हाचकोणी फरक करणारा किंवा चांगले आणि वाईट यातील फरक दाखवणारा.)अंकुश आणि वेदांत हा अत्यंत मधुर असलेला मोदक म्हणुन शोभतो.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*एके हाति दंतु । जो स्वभावता खंडितु ।*
*तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ॥१२॥*
*✏एका हातामध्ये*,जो मुळातच खंडीत झालेला असा दात आहे.ते बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले,स्वभावतःच खंडीत असलेले बौद्धमत यांचे निदर्शक आहे.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।*
*धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥१३॥*
*✏मग*(व्याससुमावरील वृत्तिच्या व्याख्यानातीलबौद्धमताचे खंडन)झाल्यावर चांगला(वेदानुकुल)तर्क करणारे तत्वज्ञान सहजपणे(सुप्रतिष्टिपित होते)तो सत्कारवादगणपतीचे इच्छित फल प्राप्त करुन देणारा.अभय हस्त होय धर्माची स्थापना (करणारे जे शास्ञ)तो धर्म जिज्ञासु लोकांसाठी सतत वर देणारा हस्त होय.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।*
*जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥१४॥*
✏जेथे *समाधिसुखाचा* परमानंद विशुद्ध स्वरुपात अनुभवास येतो.असे सारासार विवेकाने भरलेले विशुद्ध ज्ञान तीच सरळ लांब सोंड होय.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।*
*देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥*
*✏या संबंधात*(युक्तिवादांचा,साधनांचा किंवा सृष्टीतील तत्वांचा)परस्परातील सुसंवाद हाच(गणेशमुर्तिचा)निःपक्षपणारुपी शुभ्र वर्ण असलेला दात होय अंतस्फुर्त ज्ञानरुप सुक्ष्मदृष्टी असलेला विघ्नाचा नियामक असा हा देव आहे.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी ।*
*बोधमदामृत मुनी ।अली सेविती ॥१६॥*
*✏पुर्व मीमांसा* उत्तर मीमांसा गणेशमुर्तिच्या दोन्ही कानांच्या ठिकानी वाटतात.त्यातील ज्ञान मदरुप अमृत मुनीरुपी भ्रमर त्याचे सेवन करतात.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।*
*सरिसे एकवटत । इभ मस्तकावरी ॥१७॥*
*✏श्रुतीस्मृति* यांच्यामध्ये प्रतिपादिलेली तत्वे हिच.(गणेशमुर्तिच्या)अंगावरील सतेज पोवळी असुन व्दैत आणि अद्वैत मते हीच त्या गजाननाच्या मस्तकावर तुल्य बळाने एकञ राहिली आहेत.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे ।*
*तिये कुसुमे मुगुटी सुगंधे । शोभती भली ॥१८॥*
*✏आत्मज्ञानरुपी* मध देण्यास ज्याच्या पुष्परसाची ख्याती आहे.अशी ईश्यावास्यादी दहा उपनिंषदे गंडस्थळावरील मुकुटावर शोभुन दिसतात.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।*
*मकार महामंडल । मस्तकाकारे ॥१९॥*
*✏ॐ* या अक्षरावर गणेशमुर्तिची कल्पना केली असता अकार हे दोन पाय ,उकार विशाल उदराच्या स्थानी स्थानी आणि मकार हे मस्तकाच्याआकारासारखे वर्तुळ दिसते.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले ।*
*ते मियां गुरूकृपा नमिले । आदिबीज ॥२०॥*
✏हे *तिन्ही* एकञ आले.त्यांनी सर्व वाड्ढमय विस्तार व्यापुन टाकला.सर्व सृष्टिच्या आद्द कारण (गणरायाला) मी वाकुन नमस्कार करतो 
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकला कामिनी ।*
*ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥२१॥*
✏आता *नविनच* अपुर्व असे वाड्ढमय निर्मितेचे विलास करणारी
उच्च कैाशल्ययुक्त वाचा वैभव प्रकटवनारी अशी जी सरस्वती तिला मी वंदन करतो.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*मज हृदयी सद्गुरू । तेणे तारिलो हा संसारपूरु ।*
*म्हणऊनि विशेष अत्यादरू । विवेकावरी ॥२२॥*
*✏ज्यांनी* मला या संसारपुरातुन तारिले.ज्या सद्गुरुनीं माझ्या अंतकरणात वास केला आहे.म्हणुन माझु बुद्धि विशेष करुन विवेकावर प्रेम करते.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*जैसे डोळ्यां अंजन भेटे । मग दृष्टीसी फांटा फुटे ।*
*मग वास पाहे तेथ प्रकटे । महानिधी ॥२३॥*
*✏ज्याप्रमाने* डोळ्यात अंजन घातल्यानंतर दृष्टिला विशेष सामर्थ्य प्राप्त होते.मग भुमीगत द्रव्याचा ठेवा सहजपणे दिसु लागतो.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*कां चिंतामणी जालया हाती।सदा विजयवृत्ति मनोरथी ।*
*तैसा मी पूर्णकाम श्री निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ॥२४॥*
*✏चिंतामनी* स्वाधिन झाल्यावर सर्व मनोकामना सिद्धिला जातात त्याचप्रमाने सद्गुरु निवृत्तीनाथांमुळे माझ्या सर्व मनोकामना विजयी झाल्या आहेत.असे ज्ञानदेव सांगतात.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*म्हणोनि जाणतेनो गुरू भजिजे।तेणे कृतकार्य होईजे।*
*जैसे मूळसिंचने सहजे।शाखापल्लव संतोषती ॥२५॥*
*✏याकरिता* शहान्या मानसांनी गुरुला शरण जावे. त्यांची सेवा करावी. ज्याप्रमाने एखाद्या झाडाला मुळाशी पाणी घातले असता. फांदी व पाने यांना आपोआप टवटवी येते. म्हणजेच कार्य तडीस(सिद्धिस)पोहचते.

💝🌟💝🌟💝🌟💝🌟💝🌟
*🌻हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे🌻*
⛳⛳⛳⛳🔮⛳⛳⛳⛳
*🙏🌻🌹राम कृष्ण हरि🌹🌻🙏*
      *हनुमंत खाडे*
           *९६६५६५६५९२*

बुधवार, ४ जानेवारी, २०१७

श्री ज्ञानेश्वरमहाराजांचे संक्षिप्त चरित्र

अवख्या जगाला आपल्या पासायदानातून विश्वशांतीचा
संदेश देणाऱ्या भगवान श्री ज्ञानोबा रायांचा जन्म श्रीक्षेत्र आळंदी येथे शके ११९३ साली झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रखुमाबाई असे होते.
भगवान श्री ज्ञानोबाराय हे विठ्ठलपंतांचे दुसरे आपत्य
त्यांना एकूण चार आपत्य झाली
त्यातील सर्वात मोठे निवृत्तीनाथ त्यानंतरचे ज्ञानोबाराय,
नंतरचे सोपानदेव व सर्वांत धाकट्या मुक्ताबाई.
विठ्ठलपंतांचे घराणे पवित्र, सदाचारसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते.
ते शके १०६० च्या सुमारास आपेगावचे कुलकर्णीपद त्यांच्याकडे होते.
भगवान श्री ज्ञानोबारायांचे पंजोबा त्र्यंबकपंत यांची गोरक्षनाथांशी पडून त्यांना त्यांनी उपदेशही केला होता
ज्ञानोबारायांच्या पूर्वी या घराण्यात भगवतभक्त हेच होऊन गेले
ज्ञानोबारायांचे आजोबा गोविंदपंत आणि आजी निराबाई या दोघांनाही गहिनीनाथांनी उपदेश केला होता,
क्रमशः