*💝दिवस 2 रा💝*
*🌟अध्याय पहिला🌟*
*☀सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या☀*
*💡॥अर्जुनविषादयोग॥💡*
*🔔ओव्या 11 ते 25🔔*
*९६६५६५६५९२*
⛳⛳⛳⛳☀⛳⛳⛳⛳
*तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।*
*वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११॥*
*✏तेव्हा तर्क*(अनुमान)हाच कोणी फरस(कुर्हाड)निती(आचारधर्म,कमीकर्मविचार)हाचकोणी फरक करणारा किंवा चांगले आणि वाईट यातील फरक दाखवणारा.)अंकुश आणि वेदांत हा अत्यंत मधुर असलेला मोदक म्हणुन शोभतो.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*एके हाति दंतु । जो स्वभावता खंडितु ।*
*तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा ॥१२॥*
*✏एका हातामध्ये*,जो मुळातच खंडीत झालेला असा दात आहे.ते बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादिलेले,स्वभावतःच खंडीत असलेले बौद्धमत यांचे निदर्शक आहे.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*मग सहजे सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।*
*धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥१३॥*
*✏मग*(व्याससुमावरील वृत्तिच्या व्याख्यानातीलबौद्धमताचे खंडन)झाल्यावर चांगला(वेदानुकुल)तर्क करणारे तत्वज्ञान सहजपणे(सुप्रतिष्टिपित होते)तो सत्कारवादगणपतीचे इच्छित फल प्राप्त करुन देणारा.अभय हस्त होय धर्माची स्थापना (करणारे जे शास्ञ)तो धर्म जिज्ञासु लोकांसाठी सतत वर देणारा हस्त होय.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।*
*जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥१४॥*
✏जेथे *समाधिसुखाचा* परमानंद विशुद्ध स्वरुपात अनुभवास येतो.असे सारासार विवेकाने भरलेले विशुद्ध ज्ञान तीच सरळ लांब सोंड होय.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।*
*देवो उन्मेषसुक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥*
*✏या संबंधात*(युक्तिवादांचा,साधनांचा किंवा सृष्टीतील तत्वांचा)परस्परातील सुसंवाद हाच(गणेशमुर्तिचा)निःपक्षपणारुपी शुभ्र वर्ण असलेला दात होय अंतस्फुर्त ज्ञानरुप सुक्ष्मदृष्टी असलेला विघ्नाचा नियामक असा हा देव आहे.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी ।*
*बोधमदामृत मुनी ।अली सेविती ॥१६॥*
*✏पुर्व मीमांसा* उत्तर मीमांसा गणेशमुर्तिच्या दोन्ही कानांच्या ठिकानी वाटतात.त्यातील ज्ञान मदरुप अमृत मुनीरुपी भ्रमर त्याचे सेवन करतात.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।*
*सरिसे एकवटत । इभ मस्तकावरी ॥१७॥*
*✏श्रुतीस्मृति* यांच्यामध्ये प्रतिपादिलेली तत्वे हिच.(गणेशमुर्तिच्या)अंगावरील सतेज पोवळी असुन व्दैत आणि अद्वैत मते हीच त्या गजाननाच्या मस्तकावर तुल्य बळाने एकञ राहिली आहेत.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*उपरि दशोपनिषदे । जिये उदारे ज्ञानमकरंदे ।*
*तिये कुसुमे मुगुटी सुगंधे । शोभती भली ॥१८॥*
*✏आत्मज्ञानरुपी* मध देण्यास ज्याच्या पुष्परसाची ख्याती आहे.अशी ईश्यावास्यादी दहा उपनिंषदे गंडस्थळावरील मुकुटावर शोभुन दिसतात.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल ।*
*मकार महामंडल । मस्तकाकारे ॥१९॥*
*✏ॐ* या अक्षरावर गणेशमुर्तिची कल्पना केली असता अकार हे दोन पाय ,उकार विशाल उदराच्या स्थानी स्थानी आणि मकार हे मस्तकाच्याआकारासारखे वर्तुळ दिसते.
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*हे तिन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळले ।*
*ते मियां गुरूकृपा नमिले । आदिबीज ॥२०॥*
✏हे *तिन्ही* एकञ आले.त्यांनी सर्व वाड्ढमय विस्तार व्यापुन टाकला.सर्व सृष्टिच्या आद्द कारण (गणरायाला) मी वाकुन नमस्कार करतो
➖🌟➖🌟➖🌟➖🌟➖🌟
*आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकला कामिनी ।*
*ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥२१॥*
✏आता *नविनच* अपुर्व असे वाड्ढमय निर्मितेचे विलास करणारी
उच्च कैाशल्ययुक्त वाचा वैभव प्रकटवनारी अशी जी सरस्वती तिला मी वंदन करतो.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*मज हृदयी सद्गुरू । तेणे तारिलो हा संसारपूरु ।*
*म्हणऊनि विशेष अत्यादरू । विवेकावरी ॥२२॥*
*✏ज्यांनी* मला या संसारपुरातुन तारिले.ज्या सद्गुरुनीं माझ्या अंतकरणात वास केला आहे.म्हणुन माझु बुद्धि विशेष करुन विवेकावर प्रेम करते.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*जैसे डोळ्यां अंजन भेटे । मग दृष्टीसी फांटा फुटे ।*
*मग वास पाहे तेथ प्रकटे । महानिधी ॥२३॥*
*✏ज्याप्रमाने* डोळ्यात अंजन घातल्यानंतर दृष्टिला विशेष सामर्थ्य प्राप्त होते.मग भुमीगत द्रव्याचा ठेवा सहजपणे दिसु लागतो.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*कां चिंतामणी जालया हाती।सदा विजयवृत्ति मनोरथी ।*
*तैसा मी पूर्णकाम श्री निवृत्ती । ज्ञानदेवो म्हणे ॥२४॥*
*✏चिंतामनी* स्वाधिन झाल्यावर सर्व मनोकामना सिद्धिला जातात त्याचप्रमाने सद्गुरु निवृत्तीनाथांमुळे माझ्या सर्व मनोकामना विजयी झाल्या आहेत.असे ज्ञानदेव सांगतात.
➖☀➖☀➖☀➖☀➖☀
*म्हणोनि जाणतेनो गुरू भजिजे।तेणे कृतकार्य होईजे।*
*जैसे मूळसिंचने सहजे।शाखापल्लव संतोषती ॥२५॥*
*✏याकरिता* शहान्या मानसांनी गुरुला शरण जावे. त्यांची सेवा करावी. ज्याप्रमाने एखाद्या झाडाला मुळाशी पाणी घातले असता. फांदी व पाने यांना आपोआप टवटवी येते. म्हणजेच कार्य तडीस(सिद्धिस)पोहचते.
💝🌟💝🌟💝🌟💝🌟💝🌟
*🌻हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे🌻*
⛳⛳⛳⛳🔮⛳⛳⛳⛳
*🙏🌻🌹राम कृष्ण हरि🌹🌻🙏*
*हनुमंत खाडे*
*९६६५६५६५९२*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा